दावडीत वडीलांची डोक्यात लोखंडी घण घालून मुलाने केली हत्या

राजगुरूनगर- दावडी (ता.खेड) येथे सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाने वडील दारू पिऊन शिवीगाळ मारहाण करत असल्याच्या कारणावरुन वडीलाच्या डोक्यात लोखंडी घण घालून हत्या केल्याची घटना घडली आहे.हि घटना दि.१० मंगळवारी रात्री ११ च्या दरम्यान घडली.या घटनेमुळे दावडी परिसरात खळबळ उडाली आहे.

संतोष वाघिरे (वय ४३ रा. कान्हुरकरमळा,दावडी )असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.याप्रकरणी अल्पवयीन मुलाला खेड पोलीसांनी ताब्यात घेतले आहे

मिळालेल्या माहितीनुसार,दावडी गावच्या हद्दीत कान्हुरमळा येथे मयत संतोष वाघिरे यांचा दुग्ध व्यवसाय आहे. वडिल  रोज दाऊ पिऊन सोळ वर्षीय मुलाला शिवीगाळ मारहाण करून काम करायला लावत होते.दहा तारखेला  मुलाला दिवसभर शिवीगाळ ,मारहाण करून उपाशी गोठयामध्ये झोपायला लावले. या कारणामुळे मुलाला राग आल्याने मुलाने गोठयातील लोखंडी घणाने वडीलांच्या डोक्यात घाव घालून हत्या केली.

आदिनाथ  वाघिरे यांने भावाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. घटनास्थळी खेड पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक राहूल लाड करत आहेत

Previous articleवाशेरे ग्रामपंचायतीचा राज्यपुरस्कृत घरकुल योजना अंतर्गत सर्वोत्कृष्ट प्रथम क्रमांकाने सन्मानित
Next articleदिव्यांग अजय हिंगे यांना संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून वाढदिवसाला अनमोल भेट