वाशेरे ग्रामपंचायतीचा राज्यपुरस्कृत घरकुल योजना अंतर्गत सर्वोत्कृष्ट प्रथम क्रमांकाने सन्मानित

राजगुरूनगर- ग्रामपंचायत वाशेरे यांना राज्यपुरस्कृत घरकुल योजना अंतर्गत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. ग्रामपंचायत वाशेरे यांनी शबरी आवास घरकुल योजनेअंतर्गत आठ घरकुले आणि रमाई आवास योजनेअंतर्गत दोन घरकुले सन २०१९/२०२० या आर्थिक वर्षात सर्व प्रथम पूर्ण करून लाभार्थ्यांना संपुर्ण अनुदान त्यांचा बँक खात्यावर वर्ग करून अदा केले. पंचायत समिती खेड सभागृहात आमदार दिलीपशेठ मोहिते पाटिल ,अजय जोशी गट विकास अधिकारी व बाळासाहेब ढवळे सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्या हस्ते आज ग्रामपंचायत वाशेरे याना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी सरपंच संभाजी कुडेकर, उपसरपंच भरत तरडे , विस्तार अधिकारी श्रीम ससाणे मॅडम, गणेश काळे, अविनाश भोकटे,ग्रामसेवक निलेश पांडे उपस्थित होते.

Previous articleओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी इम्पिरिकल डेटा द्यावा- सुप्रियाताई सुळे
Next articleदावडीत वडीलांची डोक्यात लोखंडी घण घालून मुलाने केली हत्या