राहुल नायकवाडी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा

चाकण- राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शहाजी नायकवाडी यांनी आपल्या पदाचा राजीनामा आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याकडे दिला आहे.

आपल्या वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला असून पक्षाच्या संघटन कार्यात सहभागी असणार आहे असे राहुल नायकवाडी यांनी सांगितले.

या राजीनाम्याच्या प्रती नायकवाडी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर यांना पाठविलेल्या आहेत.

Previous articleमुबंई माता बाल संगोपन संस्थेच्या माध्यमातून खेड तालुक्यातील आदिवासी शाळांना टॅबचे वाटप
Next articleओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी इम्पिरिकल डेटा द्यावा- सुप्रियाताई सुळे