संत रविदास महाराज बहुउद्देशीय संस्थेमार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व समाजसेवकांना कोरोना योध्दा पुरस्कार प्रदान

अमोल भोसले,पुणे

अहमदनगर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय असणारे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी कोरोनाचा वर्ष-दीड वर्षाच्या काळात अहमदनगर जिल्ह्यामध्ये रात्रंदिवस धावपळ करत मोठे कार्य केले. जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था शांतता पाळण्यासाठी मोठे प्रयत्न केले. या त्यांच्या कर्तव्य व कामाची दखल घेत महाराष्ट्र राज्याच्या श्री संत रविदास महाराज बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था यांच्या वतीने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना कोरोना योध्दा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दीड वर्षाच्या कोरोना काळात कोरोना संदर्भात कार्य करणाऱ्या साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, सत्यशोधक रघुनाथ ढोक, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कटके, पत्रकार निलेश चांदगुडे यांना श्री संत रविदास महाराज बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने कोरोना योध्दा म्हणून पुरस्कार देण्यात आले. हा पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमर झिंजुर्डे तसेच शिवाजी पाचोरे, विशाल देसाई यांनी त्यांना बहाल केला.

श्री संत रविदास महाराज बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था ही महाराष्ट्र राज्यात विविध सामाजिक शैक्षणिक, साहित्य, कला क्षेत्रांमध्ये काम करणारी ही सेवाभावी संस्था असून या संस्थेने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व इतर मान्यवर कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे कामाचे दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कार प्रधान केल्यानंतर या सर्व अधिकाऱ्यांचे विविध मान्यवरांनी व विविध संस्थेने नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

श्री संत रविदास महाराज बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य संपूर्ण राज्याच्या जिल्ह्यात कार्यरत असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोरोना काळात रात्रंदिवस काम करणाऱ्या योद्ध्यांना कोरोना योद्धा म्हणून या संस्थेद्वारे पुरस्कार देण्यात येत आहे. हा महाराष्ट्र राज्याचा मोठा पुरस्कार मनोज पाटील यांना तसेच इतर अधिकाऱ्यांना सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकार व विविध मान्यवरांना देण्यात आल्यामुळे या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले आहे. यापुढे कोरोना काळाप्रमाणेच इतर संकटातही असेच हे अधिकारी काम करत राहू असेही शुभेच्छा यावेळी या सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पुरस्कार दिल्याबद्दल सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी श्री संत रविदास महाराज बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांचे आभार मानले आहेत. या कार्यक्रमाला संस्थेचे विविध पदाधिकारी तसेच पुरस्कार प्राप्त अधिकारी यावेळी उपस्थित होते कोरोनाच्या अटी व शर्ती राखत हा कार्यक्रम संपन्न झाला.

Previous articleदोंदे गावाचा आदर्श कृषी ग्राम पुरस्काराने सन्मान
Next articleआदिवासी कुटूंबांना ब्लँकेट, चटई वाटप ; अमित कंधारे यांचा स्तुत्य उपक्रम