संत शिरोमणी श्री सावतामाळी महाराजांची पुण्यतिथी साजरी

अमोल भोसले,उरुळी कांचन

उरुळी कांचन येथे सावतामाळी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून संत शिरोमणी श्री सावतामाळी महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. गेले दोन वर्ष करोणा विषाणूचा संसर्गाचे सावट असल्याने उरुळी कांचन माळी समाज संघाच्या वतीने प्रशासनाने लागू केलेले सर्व नियम व निर्बंधांचे पालन करत अतिशय लहान व प्रतीकात्मक स्वरूपातील कार्यक्रमाद्वारे संत शिरोमणी श्री सावतामाळी महाराजांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य संतोष कांचन यांनी कु वेदिका फोंडे या आठ वर्षाच्या चिमुकलीने १९४ देशांची नावे त्यांच्या राजधानी सह विक्रमी वेळेत सांगून इंडिया बुक पुरस्कार मिळविल्या बद्दल वेदिकाला शुभेच्छा देत असतानाच तिचा पाच हजार रुपये रोख रक्कम देऊन गौरव केला.

भाजपा व्यापार आघाडी पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विकास जगताप यांनी आपल्या व भावी पीढीसाठी सर्व संतांचे आणि राष्ट्रपुरुषांचे आचार आणि विचार दीपस्तंभा प्रमाणे प्रेरणादायी ठरणार असल्याने ऊरूळी कांचन मध्ये सर्व राष्ट्रपुरुषांचे एकता आणि समतेची प्रेरणा देणारे एकत्र स्मारक व्हावे, यातूनच सर्व समाजास आदर्श विचारांची आणि संस्काराची शिदोरी मिळेल असे सांगितले.

या ठिकाणी उरुळी कांचन माळी समाज संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक संजय टिळेकर आणि बिवरी गावचे उपसरपंच सुनील गोते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. संजय रायकर यांनी सूत्रसंचालन तर भानुदास जगताप यांनी सर्वांचे आभार मानले.

याप्रसंगी हवेली पंचायत समितीच्या माजी उपसभापती – सदस्या हेमलता बडेकर, सोमनाथ कोतवाल, बाळासाहेब ताम्हाणे, संजय गायकवाड, अनिल जगताप, गोविंद शिवरकर, अमोल जगताप, सचिन बोरावके, तुषार लोंढे, निखिल जगताप हे उपस्थित होते.

Previous articleदौंड पोलिसांच्या ताफ्यात आधुनिक स्पीड बोट दाखल
Next articleवाघोली- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे धरणे आंदोलन