दौंड पोलिसांच्या ताफ्यात आधुनिक स्पीड बोट दाखल

दिनेश पवार,दौंड

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी दौंड पोलिसांना आधुनिक स्पीड बोट व 12 लाईफ जॅकेट उपलब्ध करून दिले आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.

सर्वाधिक नदी किनारा असल्याने आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी,वाळू माफियांचा वाढता हैदोस रोखण्यासाठी या बोटचा उपयोग होणार आहे.याचे प्रात्यक्षिक पोलीस निरीक्षक नारायण पवार व त्यांच्या टीमने भीमा नदीपात्रात केले.गेल्या वर्षी आलेल्या पुरात दौंड पोलिसांनी सतर्क राहून कामगिरी बजावली होती.दौंड पोलीसांची अवैध धंदे, बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यावरती धडक कारवाई सुरू आहेच यातच या आधुनिक बोटीची उपलब्धता झाल्याने पोलिसांची चाहूल लागताच पळणाऱ्या वाळू माफियांना पकडणे सहज शक्य झाले असल्याचे नारायण पवार यांनी सांगितले.

Previous articleबारामती येथे झालेल्या प्रशिक्षणात खेड तालुक्यातील ‘या’ पाच गावच्या सरपंचाचा सहभाग
Next articleसंत शिरोमणी श्री सावतामाळी महाराजांची पुण्यतिथी साजरी