स्व.स्वप्नील कोलते यांच्या स्मरणार्थ उनाड चषक स्पर्धेचे आयोजन

अमोल भोसले,उरुळी कांचन

ग्रामीण भागातून चांगले खेळाडू निर्माण झाले पाहिजे. आपल्या गावातील लेखक उनाड कवी स्व.स्वप्नील कोलते यांचे विचार नवीन पिढीनं आत्मसात केले पाहिजे असे मत कोरेगावमुळ (ता. हवेली) येथील उद्योजक दशरथ (बापु) शितोळे यांनी व्यक्त केले. लेखक, कवी, कादंबरीकार स्व.स्वप्नील रामदास कोलते यांच्या स्मरणार्थ उनाड चषक २०२१ स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बापु शितोळे बोलत होते.

याप्रसंगी माजी सरपंच ताराचंद कोलते, माजी उपसरपंच नारायण शिंदे, माजी उपसरपंच विठ्ठल थोरात, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष जालिंदर कड, संचालक विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटी राजेंद्र शिंदे, युवा नेते योगेश जगताप, तंटामुक्तीचे अध्यक्ष योगेश गायकवाड, माजी तंटामुक्तीचे अध्यक्ष मुकिंदा काकडे, अष्टविनायक रोझ नर्सरीचे विशाल शितोळे, माजी सदस्य निखिल पवार, सर्वज्ञ फर्निचरचे मालक बाळासाहेब कोलते, गणेश कोलते, शरद कोलते, निलेश कोलते, अनिकेत कोलते, रमेश कोलते, यश कोलते, सनि कोळपे, शुभम कोलते, दिपक गोते, युवराज कोलते, श्रीमती शारदा कोलते, रामदास काकडे, प्रतिक चौधरी, सुरज बोधे,अजित काकडे, समाधान अवचट,अमर आतकर आदी उपस्थित होते.

मुकिंदा काकडे यांनी आयोजकांचे आभार मानले आणि विजेत्यांना क्रिकेटची ट्रॉफी म्हणून महाराजांचा मुकुट म्हणून वाटप करणार आहे हे सांगितलं.

Previous articleपक्ष संघटनेचे काम करताना इच्छाशक्ती आवश्यक- प्रदिप कंद
Next articleशहिद स्मारकास पंजाब येथील देशभक्त विजय सागर यांची भेट