पक्ष संघटनेचे काम करताना इच्छाशक्ती आवश्यक- प्रदिप कंद

अमोल भोसले,उरुळी कांचन

आपले नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अतिशय सक्षमपणे जनतेची बाजु समजावून घेऊन ती सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न प्रयत्न करत आहे. पक्ष संघटनेचे काम करत असताना इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. पक्ष संघटनेचे काम समाजातील तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावे. पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनच्या सुखदुःखात सहभागी होणे गरजेचे असल्याचे मत पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांनी उरुळी कांचन याठिकाणी भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बुध आढावा बैठक मध्ये आपले मत मांडले.

याप्रसंगी उरुळी कांचन भाजप शहर अध्यक्षपदी अमित सतिश कांचन यांची निवड करण्यात आली तसेच भाजप शहर अध्यक्ष विद्यार्थी ऋषीकेश शेळके यांची निवड व भाजप शहर अध्यक्ष सोशल मीडिया शुभम वलटे यांची निवड करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य भाजपचे कार्यकारणी सदस्य शिवाजी भुजबळ, कृ.उ.बा.समितीचे माजी सभापती रोहिदास उंद्रे, जिल्हा उपाध्यक्ष प्रविण काळभोर, दादासाहेब सातव, जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी, हवेली ता.भाजप अध्यक्ष सुनिल कांचन, भाजपचे पश्चिम व्यापारी आघाडीचे अध्यक्ष विकास जगताप, जिल्ह्याचे भाजपचे सहकोषाध्यक्ष श्रीकांत कांचन, क्षेत्रीय रेल्वे समितीचे सदस्य अजिंक्य कांचन, ओबीसी प्रदेश सरचिटणीस सारिका लोणारी, लोणीकंदचे मा.उपसरपंच रवींद्र कंद, जयप्रकाश सातव, विजय जाचक, अनिल सातव, सुनिल तुपे, गणेश चौधरी, विकास चौधरी, गुरुनाथ मचाले, मच्छिंद्र कड, शूभम तुपे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleसमाजसेवक नामदेव भोसले यांच्या प्रयत्नांतून मनोरुग्णाला भेटली आई – विशाल बनकर
Next articleस्व.स्वप्नील कोलते यांच्या स्मरणार्थ उनाड चषक स्पर्धेचे आयोजन