समाजसेवक नामदेव भोसले यांच्या प्रयत्नांतून मनोरुग्णाला भेटली आई – विशाल बनकर

अमोल भोसले

सावली सहरी बेघरासाठी निवारा केंद्र या ठिकाणी राहणारा मानसिक रोगी मुलाची आईची भेट साहित्यिक, नामदेव भोसले यांच्या प्रयत्नामुळे झाली असे गोंदियाचे उपमुख्य अधिकारी विशाल बनकर यांनी सांगितले ते  पुढे म्हणाले की आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले हे गोंदिया जिल्हा येथील आमंगाव पोलिस ठाण्यात अतंर्गत गरीब कुटुंबातील  काही गरीब महीलाना व मुलांना दप्तर आणी कपडे वाटप कार्यक्रम आले होते. त्यावेळी त्यांनी माझ्या संगे सावली निवारा केंद्राला भेट दिली. एका पिढीत मनोरुग्णाची कैफियत ऐकुन त्यांनी तुरंत मदतीस होकार दिला व नामदेव भोसले यांनी त्यांचे मित्र आमगाव पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विलास नाळे यांना फोनवर सदरची माहिती सांगीतली नाळे यानी तुरंत पिढीत व्यक्तीच्या घरच्यांचा व आईचा शोध घेतला आणि दिड वर्ष दुरावलेल्या मनोरुग्ण मुलाची आईची भेट घालून दिली.

 गेली दिड वर्ष आई पासून दुरावलेला ४४ वयाचा तरुण मानसिक रोगी यांची दिड़ वर्षा नंतर सावली सहरी बेघरसाठी निवारा केंद्र गोंदिया या ठिकाणी त्याच्या आई सी भेट झाली. मा. मुख्याधिकारी साहेब यानी फोनवरुण माहिती दिली की  एक व्यक्ती समसान रोड वर आहे त्वरित निवारा केंद्रची टीम ठिकाणी पोहोचली त्याची अवस्था फार गंभीर होती व तो मानसिक आजारी होता आम्ही त्याला निवारा केन्द्रात आणले त्याची आंघोळ करुण चांगले कपडे घालण्यात आले आणि हॉस्पिटल मधे नेण्यात आले. डॉक्टरनी त्याची तपासनी केली आणि त्याच्या पायाला जखम झाल्यामुळे कापावा लागु सकतो असा सला दिला आम्ही डॉक्टरना विनंती केली की आधी उपचार करा नंतर वेळ पडल्यावार पाहु डॉक्टरनी उपचार केल त्याची जखम साफ करुण ड्रेसिंग करण्यात आली. व आम्ही नियमित त्याचे औषध उपचार आणि कड़जीवाहक यानी नियमित देखरेखा व काढजी घेतली दिवसन दिवस त्यांच्यात सुधारना होण्यास सुरवात झाली व आता स्वतःहून चालत आहे. त्याचा मानसिक स्थितित सुधारना होत आहे. त्याला विचारले असता त्यांनी आपले नाव राजेश नागभीड़े राहणार रिसामा आमगव सांगितले आम्ही आमगांव पोलिस्टेशन ला त्याची माहिती दिली त्याचा आईला माहिती झाल्या नंतर त्याची आई आपल्या मुलाला भेटायला निवारा केंद्र या ठिकाणी पोहोचली आणि आपल्या मुलाला भेटल्या नंतर रडू लागली त्याचा आई ने सांगितले की तो दिड वर्षा आधी न सांगता घर सोडून निघून गेला त्याला शोधन्याचा खूप प्रयत्न केला पण मिळाला नाही तुम्ही माझा मुलाला साभाळले त्याबदल धन्यवाद दिला या करीता साहित्यिक, नामदेव ज्ञानदेव भोसले, व आमंगाव पोलिस निरीक्षक विलास नाळे, गोदिंयाचे उपमुख्य अधिकारी विशाल बनकर,  धनराज बनकर, व्यवस्थापक  न. प. गोंदिया. तसेच निवारा व्यवस्थापक मा. हेमंत मेश्राम व्यवस्थापक निवारा केंद्र तसेच कड़जीवाहक पूर्णप्रकाश कुथेकर, रविंद्र बोरकर, राजेन्द्र लिल्हारे यानी सहकार्य केले.

Previous articleजोर जांभळीतील पूरग्रस्तांना मराठी पत्रकार परिषदेचा मदतीचा हात
Next articleपक्ष संघटनेचे काम करताना इच्छाशक्ती आवश्यक- प्रदिप कंद