अटल आरोग्य रथाच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी : राहुल शेवाळे यांचा स्तुत्य उपक्रम

अमोल भोसले,उरुळी कांचन

अटल आरोग्य रथाच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यामध्ये मोफत आरोग्य तपासणी उपक्रम चालू असून खेडोपाडी व लहान मोठ्या गावामध्ये तपासणी आयोजित केली जात आहे.आरोग्य तपासणी मोहिमेचा नागरिकांनी लाभ घेऊन आपल्या आरोग्य संबंधित तक्रारी आवश्यक उपाययोजना याची तज्ञ डॉक्टर मार्फत माहिती घ्यावी व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा सरचिटणीस अविनाशकाका बवरे यांनी केले तसेच राहुल शेवाळे यांच्या मार्फत सुरू असलेल्या स्तुत्य उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या वतीने पुरंदर हवेली मतदारसंघातील जनतेच्या आरोग्य तपासण्यासाठी सुरु असलेल्या अटल आरोग्य रथ या उपक्रमात ज्येष्ठ समाजसेविका अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या कुंभारवळण येथील ममता बाल सदन मधील १२५ मुलांची व कर्मचारी वर्गाची मोफत आरोग्य तपासणी पुणे जिल्हा भाजपा सरचिटणीस अविनाश बवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

यावेळी तालुका सरचिटणीस श्रीकांत थिटे नदीम इनामदार, अनुसूचित मोर्चाचे राजेश ठवाळ, हवेली युवा सरचिटणीस दिनेश भंडारी, तालुका अनुसूचित मोर्चाचे दत्ता धेंडे, रणजित जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleविक्रांत पतसंस्थेच्या वतीने कोकणातील पूरग्रस्तांना ब्लँकेट व चादर वाटप
Next articleजीवधन किल्ल्यावर फिरायला आलेल्या तरुणीचा पाय घसरून मृत्यू