विक्रांत पतसंस्थेच्या वतीने कोकणातील पूरग्रस्तांना ब्लँकेट व चादर वाटप

नारायणगाव (किरण वाजगे )

नारायणगाव येथील अग्रगण्य विक्रांत नागरी सहकारी पतसंस्थेचे सचिव स्वर्गीय सुनील वाव्हळ यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त कोकणातील चिपळूण परिसरातील पूरग्रस्तांसाठी तीनशे ब्लँकेट व चादरीचे वाटप करण्यात आले अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाजगे व सचिव निलेश गोरडे यांनी दिली.

यावेळी पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे चिटणीस सुनील शहा लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक गांधी, जयवंत वाजगे, अनिल दिवटे ,सुभाष संकलेचा,निरंजन जोगळेकर, गणेश वाजगे, राजेंद्र कोल्हे, रामदास अभंग, संजय मुथा,हनुमंत पवार, अनिकेत गाढवे,मंगेश बनकर,महेंद्र खेबडे,चेतन पडघम,सचिन कोऱ्हाळे, संस्थेचे सर्व पदाधिकारी व मित्र मंडळ हजर होते.

विक्रांत पतसंस्था स्थापना करण्यासाठी आणि संस्थेचा नावलौकिक वाढविण्यासाठी स्वर्गीय सुनील वाव्हळ यांनी पराकोटीचे परिश्रम घेतले. त्यांच्या मृत्युपश्चात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांसाठी मदत कार्य करून खऱ्या समाजकार्याचा वसा जपला आहे असे मनोगत सुनील शहा यांनी व्यक्त केले.

यावेळी सुनिल वाव्हळ यांचे स्मृतीप्रित्यर्थ लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने चिपळूण पूरग्रस्तांसाठी ५०० साड्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक गांधी यांनी सांगितले.

याप्रसंगी शिवाजी चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष अनिल दिवटे यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेहबूब काझी यांनी केले सुत्रसंचालन व आभार संचालक मुकेश वाजगे यांनी व्यक्त केले.

Previous articleजेष्ठ समाजसेवक डॉ रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राचे कार्य कौतुकास्पद- डॉ दादासाहेब जगताप
Next articleअटल आरोग्य रथाच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी : राहुल शेवाळे यांचा स्तुत्य उपक्रम