पिकअपचा पाठलाग करून नऊ लाखांचा गुटखा केला जप्त, शिरूर पोलीसांची कारवाई

शिरूर – पोलिसांनी गुटखा वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करीत सुमारे सात लाख २० हजार रुपये किमतीचा २० पोती महक पानमसाला व १ लाख ८० हजार रुपये किमतीचा पान जर्दा तंबाखू असा ९ लाख रुपये किमतीचा गुटखा वाहून नेत असलेली पिकअप गाडी ताब्यात घेतली.

मोहनसिंग रघुवीरसिंग सेंगर (वय २८, रा. कुरसंडा, माधवगड, जि. जालौन उत्तर प्रदेश, सध्या रा. सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) याला अटक केली.तर एक जण पळू गेला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना (दि.१ रोजी) गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती.मध्यरात्री करडे ते कारेगाव रस्त्याच्या चौकात पथकाने नाकाबंदी केली असताना तेथे पिकअप गाडी (एमएच १४ एक्यू ९८४३) येत असताना दिसली. पथकाने त्यास थांबण्याचा इशारा दिला, गाडी न थांबविता आतील लोक तसेच पुढे गेल्याने पथकाने ही गाडी पाठलाग करून पकडली. पिकअप गाडीत पानमसाला, तंबाखू असा एकूण ९,००,०००/- रुपयांचा गुटख्याचा माल मिळून आला.पिकअप पोलिसांनी जप्त केली.

याकारवाईसाठी निरीक्षक खानापुरे यांनी उपनिरीक्षक गणेश जगदाळे, हवालदार मुकुंद कुडेकर, जवान करणसिंग जारवाल व प्रवीण पिठले यांचे पथक नेमले होते.

Previous articleवारकरी संप्रदायाचा प्रसार व प्रचार व्हावा याकरिता हवेली तालुक्यात सामाजिक संस्थेची स्थापना-ह.भ.प आनंद महाराज तांबे
Next articleएमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा : उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर दोन दिवसात शासननिर्णय