राजेगाव येथे साठ एकरांवर ड्रीप ऑटोमेशन

दिनेश पवार,दौंड

पुणे जिल्ह्यातील राजेगाव (ता.दौंड) येथील युवा शेतकरी धनंजय आटोळे यांनी आपल्या शेतात 60 एकरांवर स्वयंचलीत ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर यश मिळविले आहे.

धनंजय आटोळे यांनी एम. एस सी ऍग्री (डेअरी सायन्स) मध्ये शिक्षण घेतले आहे. शेती मध्ये आवड असल्याने नोकरी न करता त्यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग करण्यास सुरुवात केली.पारंपारिक शेतीला फाटा देऊन आपल्या ज्ञानाच्या आणि आधुनीक तंत्रज्ञानाच्या जोरावर धनंजय यांनी ऊस,हळद,फळबागांमध्ये ड्रीप ऑटोमेशन तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी केला आहे.

पाण्याच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होऊन उत्पादनात घट होते ही बाब लक्षात आल्याने त्यांनी या नवीन पध्दतीचा उसामध्ये प्रथम अवलंब केला.ऑटोमेशन पद्धतीमध्ये जमिनीचा पोत,ऊसाची जात,लागवडीचा प्रकार व पिकाची वाढ यानुसार खत पुरवठा केला जातो.एक हजार लिटरच्या पाच टाक्या आहेत त्यातून विद्राव्य खते देण्यात येतात.यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत झाली व मजुरांचा खर्च कमी झाला तसेच उसाचे एकरी सरासरी उत्पन्न ६०-७० टनांपर्यंत पोचले, सुमारे 60 एकर ड्रीप ऑटोमेशन साठी त्यांना मोठी गुंतवणूक करावी लागली होती त्यासाठी त्यांनी शासकीय अनुदानाचा लाभ घेतला.

यांना शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या यशाने परिसरातील शेतकरी त्यांच्यापासून प्रेरणा घेत आहेत.कष्टासोबत स्मार्ट वर्क केल्याने यश मिळाले असे ते म्हणतात.योग्य देखभाल व तंत्रज्ञानाची शास्त्रीय हाताळणी याद्वारे मोठ्या क्षेत्रासाठी ही ठिबक सिंचन यंत्रणा प्रभावीपणे राबवता येते हे सिद्ध झाले आहे, असे धनंजय सांगतात.

Previous articleनिर्भीड पत्रकार राजेंद्र सोनवलकर यांना कोरोना योद्धा पुरस्कार प्रदान
Next articleपीएमआरडीएकडून विकासकामांसाठी ८१७.५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर , खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश