निर्भीड पत्रकार राजेंद्र सोनवलकर यांना कोरोना योद्धा पुरस्कार प्रदान

दिनेश पवार,दौंड

दौंड तालुक्यातील पाटस गावचे कार्यक्षम माजी सरपंच संभाजी खडके यांच्या वाढदिवसानिमित्त निर्भीड पत्रकार राजेंद्र सोनवलकर यांना आमदार राहुल कुल यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला, कोरोना काळामध्ये माजी सरपंच संभाजी खडके यांचे कार्य आहे कौतुकास्पद राहिले आहे असे मत आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले.

यावेळी रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी, वृक्षारोपण आदी कार्यक्रम घेण्यात आले, तसेच पत्रकार,वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका,आदींना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भीमा पाटसचे संचालक बाळासाहेब तोंडे पाटील दादासाहेब केसकर,अण्णा तांबे, डॉ.संदीप गावडे,डॉ. यशवंत खताळ, जयदीप सोडनवर, अशोक हंडाळ, इंजिनिअर सचिन रुपनवर, डॉ. मधुकर आव्हाड, हरीश खोमणे,मनोज फडतरे, पत्रकार सुरेश बागल, रवींद्र खोरकर आधी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल आव्हाड यांनी केले

Previous articleपीएमआरडीएकडून ८१७.५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश
Next articleराजेगाव येथे साठ एकरांवर ड्रीप ऑटोमेशन