उरूळी कांचन येथील स्मशानभूमीत वैकुंठगमन शिल्पाचे अनावरण

अमोल भोसले

उरुळी कांचन (ता.हवेली) गावच्या वैकुंठभुमीमध्ये जगतगुरू श्री.संत तुकाराम महाराज वैकुंठगमन शिल्प पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष आबासाहेब कांचन यांच्या माध्यमातून बसविण्यात आले.

यापूर्वीही नाना – नानी पार्क, घंटा गाडी, पाणी टॅंकर, वैकुंठ रथ आदी भरीव काम गावाच्या वैभवात भर घालणारी झाली आहेत. जेष्ठ नेतृत्व आबासाहेब पाटिलबुवा कांचन यांच्या मार्गदर्शनखाली दूष्टीने गावचा सर्वागीण विकास झाला पाहिजे या निरपेक्षपणे भावनेतून संतोष आबासाहेब कांचन हे सातत्याने विकासाच्या दृष्टीने झटत आहे. सामाजिक बांधिलकी जपत जनसेवा हिच ईश्वर सेवा मानुन रात्र दिवस जागुन कोव्हीडच्या रुग्णांची तन मन धनाने सहकार्य मदत सेवेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला.

याप्रसंगी सरपंच संतोष कांचन, उपसरपंच संचिता कांचन, मा.जि.प.सदस्य महादेव कांचन, माजी संचालक राजाराम कांचन, माजी उपसरपंच दत्तात्रय कांचन, जेष्ठ नेते आबासाहेब कांचन, व्यापारी असोसिएशनचे शहर अध्यक्ष संजय कांचन, ग्रामविकास अधिकारी हनुमंत डोळस, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कांचन, अमित कांचन, अनिता तुपे, प्रियांका कांचन, शंकर बडेकर, सुनिल तांबे, जयप्रकाश बेदरे, दत्तात्रय कांचन, सुनिल द.कांचन, हभप सुरेश कांचन, धैर्यसिंग शितोळे, विनोद कांचन, महादेव कांचन, माऊली तांबे, संजय वनारसे, अनिल ननावरे, सुदर्शन कांचन, दिपक कांचन आदी श्रीराम जन्मोत्सव समितीचे सदस्य तसेच भजनी मंडळ, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleस्वतःच्याच घरात गिऱ्हाईकांना बोलावून महिलांकडून वेशा व्यवसाय करून घेणाऱ्या महिलेस नारायणगाव पोलीसांनी घेतले ताब्यात
Next articleलेखी आश्वासनानंतर अष्टविनायक मार्गासाठीचे उपोषण मागे