हॅप्पी गुप्रच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत

अमोल भोसले,उरुळी कांचन

कोकणातील पूरस्थितीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असल्याने अनेकांचे संसार उघडे पडले असून पूर्व हवेली तालुक्यातील हॅप्पी गुप्रच्या माध्यमातून सामाजिक जाणीव ठेवून निरपेक्षपणे मदतकार्य केले.

उबदार रक, टॉवेल, फळे, शंभर किराणा किट वाटप रायगड जिल्ह्यातील महाड परिसरातील दादली, खरवली, गावडी, बिरवडी या गावातील पूरग्रस्त नागरिकांना हॅप्पी गुप्रच्या माध्यमातून मदत करण्यात आली. आपण कल्पना करु शकत नाही आशी अत्यंत भयंकर परस्थिती त्याठिकाणी निर्माण झाली असल्याची माहिती गुप्रच्या वतीने देण्यात आली.

आपत्ती – संकटे आल्यास आपली माणसं अडचणीत असल्यास त्याठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून सेवाभावी संस्था – अन्य मंडळी धावून जातात या वेळीही विविध ठिकाण वरुन मदतीचा ओघ चालू आहे. पण प्रशासनाने भविष्यात पूरग्रस्त अशी परस्थिती निर्माण झाली नाही पाहिजे यासंदर्भात स्थानिक पातळीवर वरील लोकप्रतिनिधी ग्रामस्थ ना बरोबर घेऊन ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे

Previous articleतळेगाव -चाकण – शिक्रापूर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी १०१५ कोटींचा निधी मंजूर
Next articleचोरीच्या मोटरसायकली विकायला आलेले चोरटे जेरबंद: नारायणगाव पोलिसांची कारवाई