गारवा हॉटेलच्या मालकाची हत्या करण्यात वापरलेल्या तलवारी लपवून ठेवल्या प्रकरणी महिलेला अटक

अमोल भोसले,उरुळी कांचन

व्यावसायिक वैमन्यस्यातून झालेल्या उरुळी कांचन ( ता हवेली ) येथील गारवा हॉटेलच्या मालकाची हत्या केलेल्या दोघांनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन तलवारी लपवून ठेवले प्रकरणी एका महिलेस अटक करण्यात आली आहे. यामुळे या हत्येत सहभागी असलेल्यांची एकूण संख्या ११ झाली आहे.

याप्रकरणी काजल चंद्रकांत कोकणे ( वय १९, रा. बिबवेवाडी, पुणे ) या महिलेला अटक करण्यात आली आहे .


यापुर्वी हडपसर परिसरातील १७ वर्षे ३ महिने वयाच्या अल्पवयीन मुलांसह निलेश मधुकर आरते ( वय २३, रा. तुकाईदर्शन, हडपसर, पुणे ), बाळासाहेब जयवंत खेडेकर ( वय ५६ ), निखिल बाळासाहेब खेडेकर ( वय २४, दोघे रा. खेडेकर मळा, उरुळी कांचन, ता हेवेली ), निखिल मंगेश चौधरी ( वय २० ), गणेश मधुकर माने ( वय २०, दोघे रा. कोरेगावमूळ ता हवेली ), प्रथमेश राजेंद्र कोलते ( वय २३, रा उरुळी कांचन, ता. हवेली ), अक्षय अविनाश दाभाडे ( वय २७, रा.सोरतापवाडी, ता हवेली ), करण विजय खडसे ( वय २१, रा. माकड वस्ती सहजपुर ता दौंड ) व सौरभ कैलास चौधरी ( वय २१, रा खेडेकर मळा ता हवेली ) यांना अटक करण्यात आली आहे.

रविवार ( १८ जुलै ) रोजी रात्री ८ – ४५ वाजण्याच्या सुमारास उरूळी कांचन येथील प्रसिध्द गारवा हॉटेलचे मालक रामदास रघुनाथ आखाडे ( वय , रा.जावजीबुवाची वाडी ता.दौंड ) हे त्यांचे हॉटेल मध्ये असताना अल्पवयीन मुलगा व निलेश आरते यादोघांनी एमएच १२ पीव्ही ५१९४ या दुचाकीवरून येवुन त्यातील अल्पवयीन मुलाने आखाडे यांचे डोके, हात व पायावर तलवारीने वार करून गंभीर जखमी केले होते. उपचार चालु असताना ते मंगळवार ( २० जुलै ) रोजी मयत झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार आखाडे यांचेवर हल्ला करण्यासाठी दोन तलवारी आणल्या होत्या. प्रत्यक्षात एकच वापरण्यात आली. अल्पवयीन मुलाने आखाडे यांचेवर हल्ला करून गंभीर जखमी केलेनंतर तो व निलेश आरते हे दोघे दुचाकीवरून काजल हिचेकडे गेले. व दोन्ही तलवारी तिचे ताब्यात दिल्या. तिने त्या लपवून ठेवल्या. काजल ही आरते याची पत्नी असल्याची माहिती पुढे येत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष काळे (गुन्हे) हे करीत आहेत.

Previous articleशेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेची आत्महत्या : नारायणगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Next articleतळेगाव -चाकण – शिक्रापूर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी १०१५ कोटींचा निधी मंजूर