जुन्नर- वडगाव कांदळी येथे रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूताकडून माती परीक्षणाबाबत जनजागृती

नारायणगाव (किरण वाजगे)

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालयातून आलेल्या कृषिदूत श्रीनित सुभाष दुबळे यांनी वडगाव कांदळी (ता.जुन्नर) येथे माती परीक्षणाबद्दल नुकतीच जनजागृती केली.

माती परीक्षणाचा मूळ उद्देश जमिनीमध्ये कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता हा आहे हे सांगताना श्रीनित दुबळे या कृषीदूताने सध्या सर्वत्र रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो ,त्याचे दुष्परिणाम शेत जमिनीतील पिकांना वाढीसाठी अन्नद्रव्याचा पुरवठा करणारे सूक्ष्मजंतू नष्ट होऊन शेतजमिनी मृत होऊ लागल्या आहेत. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतीचे श्वायलहेल्थ कार्ड तयार करून मानवी आरोग्याप्रमाणे शेतीच्या आरोग्याची काळजी घ्यावी, यासाठी माती परीक्षण करावे माती परीक्षणासाठी देताना शेताच्या वेगवेगळ्या ठिकाणांहून माती गोळा करून ती एकत्र मिसळूनन द्यावी. हे सांगताना कोणकोणत्या ठिकाणांवरील माती घेऊ नये याबद्दल माहिती सांगितली.

माती परीक्षणाचे महत्व सांगताना समतोल खतांचा वापर माती परीक्षणामुळे करता येतो. जे घटकद्रव्य कमी आहेत ते आपणास शेतीस देता येतात त्यामुळे अनावश्यक खर्च वाचतो व उत्पादनही वाढते.

रासायनिक खतांचा वापर समतोल करावा अन्यथा भविष्यकाळात मातीचा पोत इतका खालावतो की, शेती करणे खूप खर्चिक होते. यासाठी सेंद्रिय शेती हा एक पर्याय असून सेंद्रिय शेतीमधून सुरुवातीला दोन ते तीन वर्षे उत्पादन कमी निघते. पण एकदा का जमिनीचा पोत सुधारला की, उत्पन्न मोठ्या प्रमाणात होते. सेंद्रिय शेतीमधून निघणारे अन्नधान्य मानवी आरोग्यवर्धक असते याबद्दल दुबळे यांनी मार्गदर्शन केले .

यावेळी प्रगतीशील शेतकरी बबन पवार, विपुल पवार ,सुशांत पवार, अनिल पवार ,सिद्धेश पवार ,शुभम सखाराम पुंडे व अक्षय सत्यवान थोरात आदी उपस्थित होते.

Previous articleमयुर कांचन यांच्याकडून पुरग्रस्तांना किराणा किटचे वाटप
Next articleशेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेची आत्महत्या : नारायणगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल