पुणे सोलापूर महामार्गाच्या दोन्ही बाजूंची साफसफाई

अमोल भोसले,उरुळी कांचन- येथील ग्रामस्वच्छता अभियान गुप्रचा आगळा वेगळा उपक्रम सामाजिक दूरदृष्टी विचारातून पावसाळ्याचे दिवस असल्याने अत्यंत उपयुक्त असा स्तुत्य उपक्रम राबविला असल्याचे मत उरुळी कांचनचे ग्रामविकास अधिकारी हनुमंत डोळस यांनी व्यक्त केले.

पुणे सोलापूर महामार्गावरील रस्त्याच्या कडेला अनेक झाडे, झुडपे, बाभळी, गवत उगवले होते. त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना त्रास सहन करावा लागत होता. ड्रीम युवा सोशल फाउंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान गुप्र, ग्रामपंचायत उरुळी कांचन, कर्मचारी तसेच उरुळी कांचन पोलीस ठाणे यांच्या सहकार्याने रस्त्याच्या कडेला साचलेली माती, उगवलेली झाडे, झुडपे काढण्यात आली.

विविध समाजाभिमुख समाजसेवेचा वसा घेतलेले उरुळी कांचन ग्राम स्वच्छता अभियान ग्रुप नेहमीच तत्पर असतो. आपल्या देशात अशी कोणतीही जागा नाही जिथे कचरा पसरलेला नाही. आपल्या शहरातील प्रत्येक ठिकाण, प्रत्येक गाव , प्रत्येक परिसर, प्रत्येक रस्त्यावर कचरा आणि घाण पसरलेली आहे या सर्वांसाठी आपणच जबाबदार आहोत. म्हणून आपलं गाव, आपले शहर स्वच्छता राखणे ही सुद्धा आपलीच नैतिक जबाबदारी आहे. गांधीजी नेहमी म्हणायचे की जर आपल्याला समाजात बदल घडून आणायचं असेल तर प्रथम आपण स्वतः बदलले पाहिजे. हा बदल अंगी स्वीकारून, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करत ग्राम स्वच्छता अभियान ग्रुप अविरतपणे ग्रामस्वच्छता, वृक्ष संवर्धन, जनजागृती आणि समाज प्रबोधन मोहीम, रक्तदान शिबिर आणि आपत्कालीन आपत्तीसाठी मदत मोहीम अशी विविध समाजसेवेचे उपक्रम हाती घेऊन वाटचाल करत आहे.

Previous articleहिंगणी बेर्डी येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न
Next articleकोविड काळामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा आमदार अशोक पवार यांच्या हस्ते कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मान