हिंगणी बेर्डी येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न

दिनेश पवार दौंड

हिंगणीबेर्डी,काळेवाडी येथील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांच्या शुभहस्ते नुकताच संपन्न झाला.

पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या भैरोबावाडी येथील सभामंडप,स्मशानभूमी सुशोभीकरण,बंधारा,विठ्ठल नगर येथील अंगणवाडी,पाणीपुरवठा लाईन अशा विविध 35 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगणी बेर्डी ग्रामपंचायतच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

नगरसेवक बादशहा शेख,पंचायत समिती सदस्य ताराबाई देवकाते, मा.सरपंच अमित गिरमकर , सरपंच मनिषा यादव,उपसरपंच शीतल भोसले,दत्तात्रय पाचपुते,परमेश्वर गायकवाड, संभाजी खैरे,श्रीराम यादव, रावसाहेब कामठे,रघुनाथ वाघमोरे,बापूराव गायकवाड, ग्रामसेवक निगडे भाऊसाहेब व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleगारवा हॉटेलच्या मालकाची हत्या केलेले फरार दोघे अखेर जेरबंद
Next articleपुणे सोलापूर महामार्गाच्या दोन्ही बाजूंची साफसफाई