नागरिकांनी काळजी घ्यावी- पोलीस निरीक्षक नारायण पवार

दिनेश पवार,दौंड

संपूर्ण महाराष्ट्रात पुढील काही दिवस अतिवृष्टी चा इशारा दिलेला असताना आणि सध्या धरण क्षेत्रात जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील नदी,नाले,ओढे पूरपरिस्थिती निर्माण करून वाहत आहे, प्रशासनाच्या वतीने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन सावधानता बाळगावी असे आवाहन दौंड पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केले आहे.

सध्या पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे, रस्त्यावरून पाणी वाहणे, दरड कोसळणे,रस्ता खचणे,झाडे उन्मळून पडणे,असे प्रकार घडत आहेत नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये,विजा कडकडत असताना बाहेर फिरू नये, मोडकळीस आलेल्या घरात न थांबता पक्क्या घरात रहावे असे आवाहन पवार यांनी केले आहे

Previous articleनारायणगाव येथील जुन्नर रस्त्यावरील कोल्हे मळ्यातील शेतकऱ्यांनी अष्टविनायक महामार्गाचे काम केले बंद
Next articleआमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट उघडून पैशाची मागणी