कृषीविभागामार्फत कुरवंडी येथे महिलांना पिकविमा या विषयावर मार्गदर्शन

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

आंबेगाव तालुका कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामातील पिंकाच्या संवर्धनासाठी पेरणी पासून ते कापणीपर्यतचे प्रशिक्षण देण्यासाठी तालुक्याच्या विविध भागात शेतीशाळांचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यानुसार कुरवंडी येथे बटाटा व सोयाबीन पिकाची महीला शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये आत्माअंतर्गत अनुदानित बटाटा पिकाची शेतीशाळा व विनाअनुदानित सोयाबीन पिकाची शेतीशाळा घेण्यात आली. शेतीशाळेमध्ये सहाय्यक कृषी अधिकारी प्रमिला मडके यांनी कीड व रोग नियंत्रण,अवस्थेनुसार खत नियोजन,गांडूळ खत,जीवामृत बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.शेतकरी भगीनीना या शाळामध्ये खरीप पिक विमा योजना बाबत माहीती दिली यामध्ये नैसर्गिक आपत्ती ,किड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थीतीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी बांधवाना प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण देण्यात येते.या योजनेत सहभाग नोंदवण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे.या भात बाजरी सोयाबीन,भुईमूग, इ. पिकांचा समावेश करण्यात आला आहे.कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी यांना ही योजना एच्छिक आहे.शेतकर्यानी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या २.०%आहे.एच.डी.एफ. सी इरगो इन्शुरन्स कंपनीमार्फत विमा योजना राबविण्यात येत आहे.शेतकरी बांधवानी पिक विमा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेची शाखा,विविध कार्यकारी सोसायटया,नागरी सुविधा केंद्र(CSC) या ठिकाणी भरण्यात येत आहेत.

तरी सर्व शेतकरी बांधवांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आंबेगाव तालुका कृषी अधिकारी टी. के. चौधरी यांनी केले आहे.उपस्थित महिलांना परस बी किट वाटप केले. मंडळ कृषी अधिकारी,नमिता राशीनकर कृषी पर्यवेक्षक,प्रमिला मडके कृषी सहाय्यक, प्रमिला मडके संरपंच, मनिषाताई तोतरे उपसरपंच विकासशेठ बारवे कार्यक्रमाला सोशल डिस्टसिग राखून व मास्क चा वापर करून शेतीशाळा पार पडली.व उपसंरप बारवे यांनी मडके मँडमच कौतुक केल कारण कोरोनाच वातावरण असताना सुद्धा त्या कृषि विभागा च्या विविध योजना प्र्त्येक महिला शेतकरि याच्यापर्यत पोचवता त्याना सरपच यानी शुभेच्छा दिल्या व प्रत्येक आधिकार्यानी मडके मँडमचा आर्दश घेऊन आपल्या क्षेत्रात काम करावे आणि सगळेचे आभार मानले.

Previous articleभीमाशंकर परिसरात खुलेआम होणारी दारू विक्री बंद करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी
Next articleव्यंकय्या नायडूंना पत्र पाठवण्यासाठी राष्ट्रवादी युवकांच्या पोस्ट आँफिसच्या बाहेर रांगा