मुख्यमंत्री महा कौशल्य विकास प्रशिक्षण” कार्यक्रमांतर्गत मोफत शासनमान्य नर्सिंग प्रशिक्षण केंद्राचे मा.उपसभापती अमोल पवार यांच्या हस्ते उद्घाटन

चाकण-देहू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे “मुख्यमंत्री महा कौशल्य विकास प्रशिक्षण” कार्यक्रमांतर्गत मोफत शासनमान्य नर्सिंग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन खेड पंचायत समितीचे माजी सभापती अमोल दादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.

आखाड साजरा करायचाय तर हाॅटेल मराठाला नक्की भेट द्या

कोरोना कालावधीतील वाढत्या बेरोजगारीच्या समस्येवर मात करणे आणि प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून वीस हजार तरुण – तरुणीसाठी वैद्यकीय क्षेत्रातील संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तसेच कोर्स यशस्वीपणे पूर्ण करणार्यांना नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे अशी माहिती डॉ. सुदर्शन घेरडे यांनी दिली.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत येलवाडी मधील देहू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि व्हेरीशिअस बीजनेस प्रा. लि. यांच्या संयुक्त प्रयत्नांतून निवडक युवतींसाठी शासनमान्य नर्सिंग कोर्स पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अशी माहिती हर्षवर्धन कुऱ्हे यांनी दिली.

यावेळी विकास कंद अभंग प्रतिष्ठान, रणजीत गाडे उपसरपंच येलवाडी, सचिन साळुंखे मा.उपसरपंच देहू, डॉ. पांडुरंग नरळे, डॉ.पितम पालकर डायरेक्टर देहू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, निरज धुमाळ लोकशासन आंदोलन पार्टी, युवक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, राहुल मदने आदी उपस्थित होते.

Previous articleजमिनीच्या वादातून पती पत्नीला मारहाण
Next articleआखाड साजरा करायचाय तर हाॅटेल मराठाला नक्की भेट द्या