जमिनीच्या वादातून पती पत्नीला मारहाण

प्रमोद दांगट, निरगुडसर

मोरडेवाडी (ता.आंबेगाव) जमिनीच्या वादातून पती-पत्नीला घरात घुसून मारहाण केल्याची घटना 17/7/2021 रोजी सायंकाळी 6 वाजल्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत शालन अंकुश बागल ( रा.मोरडेवाडी ता.आंबेगाव पुणे ) यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून चार जणांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी शालन बागल व चिमाजी भाऊसाहेब बागल यांच्यात शेतीला पाणी भरण्यासाठी सामाईक विहीर असून दि 17 रोजी फिर्यादीचे पती विहिरीवरील मोटर चालू करण्यासाठी शेतात गेले असता त्या ठिकाणी दिपाली संदीप बागल हिने आमच्या शेतातून चालत जायचे नाही असे म्हणाली होती. त्यावरून फिर्यादी व त्यांच्यात बाचाबाची झाली होती त्यानंतर सायंकाळी सहा वाजता फिर्यादि शालन बागल व तीचा पती घरी असताना त्याठिकाणी संदीप चिमाजी बागल, दिपाली संदीप बागल ,चिमाजी भाऊसाहेब बागल ,पारूबाई चिमाजी बागल ( सर्व रा.मोरडेवाडी ता. आंबेगाव जि. पुणे ) हे घरी आले व फिर्यादीच्या घरात प्रवेश करून तुम्ही आमच्या शेतातून जायचे नाही असे म्हणत फिर्यादीच्या पतीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यावेळी फिर्यादीही मध्ये आली असता तिलाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत फिर्यादी व तिच्या पतीला मुका मार लागल्याने त्यांनी घरी उपचार घेऊन दि.20 रोजी वरील चार जणां विरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

Previous articleशेतीकामासाठी हार्वेस्टर देतो म्हणून केली शेतकऱ्याची फसवणूक
Next articleमुख्यमंत्री महा कौशल्य विकास प्रशिक्षण” कार्यक्रमांतर्गत मोफत शासनमान्य नर्सिंग प्रशिक्षण केंद्राचे मा.उपसभापती अमोल पवार यांच्या हस्ते उद्घाटन