शेतीकामासाठी हार्वेस्टर देतो म्हणून केली शेतकऱ्याची फसवणूक

प्रमोद दांगट , निरगुडसर

जाधववाडी (ता.आंबेगाव) येथील शेतकऱ्याला शेती कामासाठी मिनी हार्वेस्टर घ्यायचा असल्याने त्या व्यवहारात त्याची 3 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी शेतकरी सुमित बाळू टेमगिरे ( रा.जाधववाडी ता.आंबेगाव पुणे ) यांनी विष्णू प्रसाद शर्मा ( रा.सावेर जि. इंदोर मध्यप्रदेश ) याच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की शेतकरी टेमगिरे यांना जानेवारी २०२० साली शेती कामासाठी हार्वेस्टर घ्यायचा असल्याने त्यांनी मोबाईल मध्ये युटुबवर गुरू हिंदुस्थान हार्वेस्टर ची जाहीरात पाहुन त्यांना संपर्क केला होता. त्यानंतर विष्णु प्रसाद शर्मा ( रा.सावेर, जि. इन्दौर राज्य मध्यप्रदेश ) याने टेमगिरे यांना संपर्क करून सदर हार्वेस्टरची माहीती दिली व तो दि. ०४/०२/२०२० रोजी मंचर येथे आला असता फिर्यादी व ते भेटले असता त्याने तो तिरूपती अॅग्रो इंडस्ट्रिज सावेर जि इंदौर राज्य मध्यप्रदेश येथुन आलो असुन मी कंपनीचा मालक आहे असे सांगत सदर हार्वेस्टरची सर्व माहीती दिली. त्यावेळी त्याने फिर्यादिस नविन मिनी हार्वेस्टर हा कि.रू. ८,००,०००/ रू. ला विक्री करण्याचे ठरले त्यासाठी ३,००,०००/- रू अॅडव्हॉन्स देणे बाबत सांगितले. त्यानंतर दि. ०६/०२/२०२० रोजी फिर्यादी टेमगिरे यांनी ३,००,०००/- रु. अॅग्रो इंडस्ट्रिज नावाचे बँक ऑफ बडोदा शाखा सावेर येथिल खातेवर पाठविले. ₹ त्यानंतर त्यांनी दि. २२/०२/२०२० रोजी मला हार्वेस्टर माझे वरील पत्यावर पाठवून देण्याचे ठरले होते परंतु त्यांनी त्या तारखेस हार्वेस्टर पाठविला नाही त्यानंतर फिर्यादी यांनी वेळोवेळी विष्णु प्रसाद शर्मा यांना वारंवार फोन करून हार्वेस्टर देतो असे सांगून टाळाटाळ केली त्यानंतर फिर्यादीने पैशांची परत मागणी केली असता ती देखील दिली नाही त्यावरून आपली फसवणुक करत असल्याचे लक्षात आल्याने टेमगिरे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

Previous articleलोणी येथे मटका चालवणार्‍यावर कारवाई
Next articleजमिनीच्या वादातून पती पत्नीला मारहाण