लोणी येथे मटका चालवणार्‍यावर कारवाई

प्रमोद दांगट, निरगुडसर

लोणी (ता. आंबेगाव )येथील एका खोलीमध्ये बेकायदेशीररित्या कल्याण मटका चालवणाऱ्या एकावर मंचर पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्याजवळून 3 हजार 582 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याबाबतची फिर्याद पोलीस शिपाई सोमनाथ गवारी यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की खेड उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते याना दिनांक 20 रोजी बातमीदारा मार्फत लोणी गावच्या हद्दीत मारुती शंकर दिवटे याच्या खोलीमध्ये विनापरवाना कल्याण मटका सुरू असल्याची माहिती समजली. याबाबत त्यांनी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले,पो.शिपाई सोमनाथ गवारी ,पो.नाईक आर.डी. तांबे यांना पंच घेऊन सदर ठिकाणी छापा मारण्यास सांगितले. मंचर पोलिसांची टीम सदर ठिकाणी गेली असता त्याठिकाणी सखाराम गणपत पोखरकर वय 62 रा.वडगाव पीर ता.आंबेगाव पुणे ) हा इसम कल्याण मटका पुस्तक घेऊन बसल्याचे दिसले.

पोलिसांनी घटनास्थळावरून 3 हजार 582 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर व्यक्तीवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Previous articleउरुळी कांचनमधील गारवा हॉटेलच्या मालकाच्या हत्येप्रकरणी आठ जणांना अटक; दोघे अद्याप फरार
Next articleशेतीकामासाठी हार्वेस्टर देतो म्हणून केली शेतकऱ्याची फसवणूक