एक वर्षापासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

अमोल भोसले,उरुळी कांचन

स्थानिक गुन्हे शाखेकडून एक वर्षांपासून बलात्कार सारख्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेला पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांचे कडून फरारी आरोपीचा शोध घेऊन त्यांच्या वर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीवरुन नाव्हरा येथे सापळा रचून बलात्काराचा गुन्हा दाखल असलेला आरोपी अभिजित जयसिंग उर्फ बाळासाहेब शितोळे (वय 24 वर्षे रा.गणेगाव दुमला ता.शिरुर) याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करुन पुढील तपास संदर्भात शिरूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, दौड उपविभागीय अधिकारी राहुल धस, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पो हवा अनिल काळे, पो हवा रविराज कोकरे, पो हवा राजू मोमीन, पो ना विजय कांचन, पो कॉ अमोल शेडगे, पो कॉ मंगेश भगत, पो कॉ धिरज जाधव, पो कॉ अक्षय नवले,  पो कॉ पूनम गुंड यांनी केली आहे

Previous articleपर्यटनस्थळी पर्यटकांसाठी तारांकित दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध होणार – दिपक हरणे
Next articleउरुळी कांचनमधील गारवा हॉटेलच्या मालकाच्या हत्येप्रकरणी आठ जणांना अटक; दोघे अद्याप फरार