भीमाशंकर परिसरात खुलेआम होणारी दारू विक्री बंद करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी

राजगुरुनगर-भिमाशंकर व परिसरात सध्या कोरोणा परिस्थितीत व वर्षाच्या ३६५ दिवस अवैध्य धंदे व दारु विक्री राजरोस पणे चालू असून वेळो वेळी स्थानिकांनी तक्रार करुनही व काही पुरावे सादर करुनही धंदे बंद होत नाही.काही दिवसांपुर्वी वाडा बिटच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या घरी खुलेआम दारु विक्री करतानाचे पुरावे सुद्धा पोलीसांना सादर केले आहेत.याला नेमकं कोण जबाबदार आहे.याची माञ उकल होत नाही.परंतू भागातील सामाजिक बांधीलकी जपण्याचे कार्य उराशी बाळगणारे कार्यकर्ते यांनी या गोष्टीकडे लक्ष देत आत्ता एक पाऊल पुढे उचलले आहे. नागरीकांना प्रबोधन करुन अवैध्य धंदे बंद करण्यात यावेत यासाठी भागात चर्चा चालू केली आहे.वेळो वेळी अर्ज करुनही पाहीजे तशी कारवाई होत नाही.त्यामुळे भागातील सामाजिक बांधीलकी जपणारे कार्यकर्ते विजयभाऊ कोरडे,शरदभाऊ जठार,.नंदकुमार स.गोपाळे, सुनील मिलखे, सतीष सावंत,.महेशकुमार वाघमारे ,विठ्ठल सोळसे सौ.मोनिकाताई जठार (महीला संघटक)इत्यादी कार्यकर्ते व नागरीकांनी या वाईट गोष्टींचा बिमोड झाला पाहीजे.आशी मागणी खेड पोलीस स्टेशनला अर्जाद्वारे मांडली आहे.तरी या गोष्टीची योग्य दखल घेण्यात यावी व भागातील सर्वच अवैध्य धंदे कायमस्वरूपी बंद करावेत तसेच वाडा बिटचा बिट अंमलदार व सफाई कर्मचारी बदलला गेला पाहिजे ही मागणी लावून धरली आहे.अन्यथा महीलांच्या मार्फत उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सौ.मोनीकाताई जठार (सा.कार्यकर्ते,महीला संघटक) व काही सामाजिक संघटणानी केला आहे.

Previous articleदौंड मध्ये अजित वृक्ष संकल्पना राबवून उपमुख्यमंत्री-मा.अजित पवार यांचा वाढदिवस साजरा
Next articleकृषीविभागामार्फत कुरवंडी येथे महिलांना पिकविमा या विषयावर मार्गदर्शन