सराईत गुन्हेगारांकडून तीन गावठी पिस्तूलांसह जिवंत काडतुसे जप्त

वाढदिवसाच्या जाहिरात

अमोल भोसले,उरुळी कांचन

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने तडीपार गुंड आणि सराईत गुन्हेगार यांच्या कडून ३ गावठी पिस्तुल २ जिवंत काडतुसे व एका दुचाकीसह १ लाख ५५ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी रोहित विजय अवचरे ( वय २४, रा. पर्वती ) व आदित्य सोपान साठे ( वय २६, रा. पर्वती पायथा ) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांचे पथक मंगळवारी राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना गोपनीय खबऱ्यामार्फत दोघे एक काळ्या रंगाच्या दुचाकीवरून कोंढणपूर फाटा येथील पुलाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून सदर ठिकाणी पथकाने सापळा रचून गाडी वरून आलेल्या अवचरे आणि साठे यांना ताब्यात घेतले.

त्यांची अंग झडती घेतली असता दोघांच्या कंबरेला प्रत्येकी एक गावठी बनावटीचे पिस्तुल मिळून आले. तसेच त्यांच्याकडील गाडीची डिक्की तपासल्यावर त्यामध्ये एक गावठी पिस्तुल अशी एकूण ३ गावठी पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसे आढळून आली. दुचाकी आणि शस्त्रे मिळून एकूण १ लाख ५५ हजार २०० रु किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील कारवाईसाठी दोघांना मुद्देमालासह राजगड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

Previous articleबजरंग दल आयोजित रक्तदान शिबिरात महिलांचाही उस्फुर्त सहभाग
Next articleदेशासमोरील कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे पांडूरंगाच्या चरणी प्रार्थना-विठ्ठल देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र कांचन