बजरंग दल आयोजित रक्तदान शिबिरात महिलांचाही उस्फुर्त सहभाग

राजगुरूनगर-“विश्व हिंदू परिषद बजरंग दल- दुर्गवाहिनी यांच्यावतीने चंद्रशेखर बाणखेले यांच्या स्मृती प्रीत्यर्थ सलग 14 वर्षे महारक्तदान सप्ताह आयोजित केला जातो. यंदाही खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील 12 गावांत रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात आली होती. खेड तालुक्यातील राजगुरूनगर ह्या ठिकाणी 18 जुलैला दत्त मंदिर, एसटी. स्टॅण्ड ह्या ठिकाणी बजरंग दल व लोकमत समूहातर्फे संयुक्तिकपणे रक्तदान आयोजित केले गेले होते. लोकमत समूहाचे स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या जयंती प्रीत्यर्थ लोकमत परिवार ह्यावर्षी बजरंगदल सोबत ह्या महारक्तदान सप्ताहात जोडला गेला. एकूण 223 रक्तदात्यांनी यात रक्तदान करत आपला सहभाग नोंदवला.

रक्तदान शिबिराचे उदघाटन प्रसंगी शंकर मठाचे १०८ यती प्रमेश्वर महाराज, जिल्हा संयोजक संतोष खामकर, अँड. निलेश बाळासाहेब आंधळे, संघ चालक शरदराव सोनटक्के, मंचर संयोजक अक्षय जगदाळे, मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, सह्याद्री प्रतिष्ठान चे बाबासाहेब दिघे, रोटरी क्लब चे अध्यक्ष अजित वाळुंज, गणेश घुमटकर, जितेंद्र गुजराथी, अविनाश कहाणे, अविनाश कोहिणकर आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

ह्या रक्तदानाच्या कार्यक्रमाला लोकसहभागातून यशस्वी बनवण्यासाठी आधीपासून तयारी सुरू होते. लोकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती करत त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी बजरंग दल गोरक्षा प्रमुख गणेश रौन्धळ, जिल्हा प्रचार व प्रसार प्रमुख गणेश मांजरे, शहर प्रखंड संयोजक अक्षय पऱ्हाड, ओंकार सोनार, सह संयोजक मयूर सावंत, गोरक्षक दीपक गावडे, योगीराज करवंदे, मंत्री दत्ता पोखरकर, शाखा संयोजक नितीन काळे, आदेश शिंदे, सौरभ पाटोळे, तेजस भानुसे, सह-संयोजक मोहनदास गावडे, सोहम कहाणे, मयुर भगत, अमोल डमरे, सागर खैरनार, भाजपाचे योगेश पवार, सागर तनपुरे, अमोल काळे, अनिकेत वाळुंज, अनिकेत बोऱ्हाडे, ग्रा.पं.सदस्य नरेंद्र वाळुंज, रा.स्व. संघाचे विश्वजित दीक्षित, कृष्णा कुलकर्णी, दीक्षित काका आदी कार्यकर्त्यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

दिवसभरात ह्या रक्तदान स्थळी खेड तालुक्याचे लोकप्रिय कार्यक्षम आमदार श्री. दिलीप मोहिते पाटील, विश्व हिंदू परिषद कार्याध्यक्ष धनाजी(मामा) शिंदे, बजरंग दल विभाग संयोजक संदेशभाऊ भेगडे, आंबेगाव तालुका सहसंयोजक गणेश राऊत, राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक सतीशशेठ नाईकरे यांनी भेट देऊन सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.

ह्या रक्तदानात रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना वर्षभरात केव्हाही रक्ताची गरज लागल्यास एक रक्तपिशवी मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. बजरंगदलच्या वतीने रक्तदात्यांना प्रशस्तीपत्रक तसेच, रोटरी क्लब राजगुरूनगर यांच्यावतीने सॅनीटायझर, N95 मास्क, अल्पोहार पॅकेट भेटवस्तू म्हणून देण्यात आले.

Previous articleपुणे नाशिक रेल्वे भूसंपादनासाठी शेतकऱ्यांचा विरोध
Next articleसराईत गुन्हेगारांकडून तीन गावठी पिस्तूलांसह जिवंत काडतुसे जप्त