दौंड शहरातील युवकांचा रिपाइं (ए.आंबेडकर) मध्ये प्रवेश

दिनेश पवार,दौंड

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या उपस्थितीत व महाराष्ट्र युवक अध्यक्ष अमित भाऊ वर्मा, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, मुंबई युवाध्यक्ष अक्षय दादा निकाळजे, प्रदेश सचिव ससाणे साहेब यांच्या मार्गदर्शनात शेकडो कार्यकर्त्यांनी रिपाइं (आंबेडकर) मध्ये प्रवेश केला आहे, त्यामध्ये दौंड शहर युवक आघाडी मध्ये राकेश काळे,सनी गायकवाड,अजित भालेराव,गौतम सोनवणे,सुमित कांबळे असे दौंड शहरातील विविध भागांतील युवकांनी दौंड तालुकाध्यक्ष सचिन भाऊ खरात यांच्या नेतृत्वात प्रवेश केला आहे.


यावेळी दौंड तालुका उपाध्यक्ष राम देवडे, दौंड मुस्लिम आघाडी अध्यक्ष फिरोज भाई तांबोळी, दौंड शहर उपाध्यक्ष ईश्वर सांगळे, दौंड शहर युवक अध्यक्ष पृथ्वी खंडाळे, दौंड विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभय भोसले उपस्थित होते

Previous articleसंत तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन चाललेल्या शिवशाही बसचे उरुळी कांचन मध्ये स्वागत
Next articleकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी वाढदिवस साजरा न करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय