संत तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन चाललेल्या शिवशाही बसचे उरुळी कांचन मध्ये स्वागत

अमोल भोसले

उरुळी कांचन (ता.हवेली) ग्रामपंचायतच्या वतीने शिंदवणे चौकात पंढरीच्या दिशेने निघालेल्या शिवशाही एस. टी.बसने चालविलेल्या संत तुकाराम महाराजांच्या पादुकाचे टाळ – मृदंगाच्या गजरात तसेच फुलांच्या पाकळ्यांची उथळण करीत स्वागत सरपंच संतोष कांचन, उपसरपंच संचिता कांचन, पु.जि.नि.समितीचे सदस्य संतोष कांचन, ग्रा.प.सदस्य भाऊसाहेब कांचन, माजी सरपंच दत्तात्रय कांचन, मा.उपसरपंच सुनील द.कांचन, महादेव कांचन, अरुण कांचन, हभप तुकाराम जगताप, दिपक कांचन तसेच ग्रामपंचायत सदस्य – कर्मचारी यांनी केले.

पंढरपूरच्या सावळ्या विठू रायच्या ओढीने परंपरेने पंढरपूरला जाण्याऱ्या संत तुकाराम महाराजांच्या चलपादुका यंदाही कोरोनामुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थित शिवशाही एस.टी.बसने आळंदीतून पंढरपूरला मार्गस्थ झाल्या. प्रतिवर्षी लाखोंच्या सोहळ्यातील पायी चालताना येणा-या वारीच्या आनंदास सलग दुस-यांदा मुकावे लागले. परिणामी गाडीने वारी करावी लागत असल्याने शिवशाहीतील वारकऱ्यांनीही डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

Previous articleपृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचे ‘कृतज्ञता सेवाकार्य’ कौतुकास्पद – सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते
Next articleदौंड शहरातील युवकांचा रिपाइं (ए.आंबेडकर) मध्ये प्रवेश