दौंड मध्ये अजित वृक्ष संकल्पना राबवून उपमुख्यमंत्री-मा.अजित पवार यांचा वाढदिवस साजरा

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

दौंड तालुक्यातील केसनंद याठिकाणी पै.संदीप आण्णा हंबीर मित्र मंडळाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस अजित वृक्ष ही संकल्पना राबवून साजरा करण्यात आला,यावेळी परिसरात कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सॅनिटायजर चे वाटप करण्यात आले व काळजी घ्या,घाबरू नका पण सतर्क रहा,असा संदेश देण्यात आला. 

या मित्र मंडळाचे अजित वृक्ष या संकल्पनेचे हे तिसरे वर्ष आहे, गेली तीन वर्षांपासून सेल्फी विथ अजित वृक्ष ही संकल्पना यशस्वीपणे राबविली जात आहे,परिसरात पर्यावरण समतोल राखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात येते,भविष्यात ही संकल्पना व्यापक स्वरूपात सर्वत्र राबविण्यात येणार असल्याचे पै.संदीप आण्णा हंबीर यांनी सांगितले,

Previous articleउपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तक घेतलेल्या अतितीव्र कुपोषित बालकांसाठी पोषण आहार किट चे वाटप
Next articleभीमाशंकर परिसरात खुलेआम होणारी दारू विक्री बंद करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी