धामण्यात सेवानिवृत्त सैनिकाचा सन्मान !

चाकण- भारतीय सैन्य दलात १७ वर्ष देशसेवा करुन निवृत्त झालेले जवान नवनाथ अंकुश भोकसे यांना सन्मानचिन्ह व प्रमानपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. हुतात्मा राजगुरु सैनिक सेवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि धामणे ग्रामस्थांनी या सन्मान सोहळ्याचे कौटुंबिक स्वरुपात आयोजन केले होते.

यावेळी हुतात्मा राजगुरु सैनिक सेवा चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संतोष भोगाडे, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अंकुशराव कोळेकर, जिल्हा कृषिनिष्ठ पुरस्कार विजेते माजी सरपंच काळूराम कोळेकर, सरपंच महेंद्र कोळेकर, खेड तालुका शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष धर्मराज पवळे, सैनिक ट्रस्टचे सचिव चंद्रशेखर जाधव, उपाध्यक्ष तानाजी टोपे, कोषाध्यक्ष कैलास गारगोटे, सैनिकपिता अंकुशराव भोकसे आणि सैनिक प्रतिनीधी व मर्यादित ग्रामस्थ उपस्थित होते. समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम करणार असल्याचे निवृत्त सैनिक नवनाथ भोकसे यावेळी म्हणाले.

यावेळी काळूराम कोळेकर, अंकुशराव कोळेकर, धर्मराज पवळे, दत्तात्रय टोपे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण करंडे यांनी केले. अंकुशराव भोकसे यांनी आभार मानले.

Previous articleउरूळी कांचनमध्ये हॉटेल व्यवसायीक रामदास आखाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला
Next articleपृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचे ‘कृतज्ञता सेवाकार्य’ कौतुकास्पद – सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते