उरूळी कांचनमध्ये हॉटेल व्यवसायीक रामदास आखाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला

अमोल भोसले,उरुळी कांचन

उरुळी कांचन येथील सुप्रसिद्ध असलेल्या हॉटेल गारवाचे मालक रामदास आखाडे यांच्यावर रविवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यामध्ये रामदास आखाडे हे गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेचे CCTV या फुटेजमध्ये एक हल्लेखोर तलवारीने रामदास आखाडे यांच्यावर सपासप वार करताना दिसत आहे. अज्ञात व्यक्तींनी तलवारीने हल्ला केला त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोघे जण दुचाकी वाहनावरून आले त्यातील एकाने हाँटेलमध्ये प्रवेश केला व रामदास यांना काही कळण्याच्या आत हातातील तलवारीने सपासप वार केले. त्यांनंतर हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले. हल्ल्याची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी पोहचले.

Previous articleरोटरी क्लब चाकण एअरपोर्ट अध्यक्षपदी हनुमंत कुटे
Next articleधामण्यात सेवानिवृत्त सैनिकाचा सन्मान !