रोटरी क्लब चाकण एअरपोर्ट अध्यक्षपदी हनुमंत कुटे

चाकण-रोटरी क्लब चाकण एअरपोर्ट अध्यक्षपदी हनुमंत कुटे  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हॉटेल राजरत्न येथे आयोजित कार्यक्रमात हनुमंत कुटे सह इतर कार्यकारी समितीतील पदाधिकारी व सदस्यांचे अधिकारग्रहण पार पडले.

क्लबचे नुतन सचिव म्हणुन गणेश गिरमे यांची नियुक्ती करण्यात आली. इतर पदाधिकारी पुढील प्रमाणे ः- सहसचिव- रवींद्र भोर, खजिनदार-सुधीर वाघ, इतर सदस्य-संदिप मेदनकर, रतीलाल बडगुजर, सतीश बारवकर,धीरज परदेशी, माऊली मुंगसे तुकाराम कांडगे, संतोष भोसले, संतोष वाव्हळ, दत्तात्रय बुटे, मनोज मांजरे,चद्रकांत परदेशी, दिपक कर्नावट,इक्बाल शेख,अमृत जाधव, हिना शेख, जयश्री वाघ,गणेश शेवकर.

रोटरी इंटरनॅशनल ही संपूर्ण जगभर देदीप्यमान समाजोपयोगी कार्य करणारी जागतिक नामांकित सेवाभावी संघटना आहे. शहरातील दातृत्ववान व कर्तृत्ववान व्यक्तींचा समावेश असलेल्या रोटरी क्लबने सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळ्या उपक्रमाचे माध्यमातून केलेले कार्य हे निश्चितच कौतुकास्पद आहे,

अधिकारग्रहण कार्यक्रमाला रोटरी डिस्ट्रिक्ट प्रांतपाल पंकज शाह आणि उप प्रांतपाल संदिप बागडे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. मावळते अध्यक्ष वर्षा कड आणि सचीव सुनील कड यांच्या कडून  नवीन संचालक मंडळाने पदभार स्वीकारला. संदीप मेदनकर यांनी आभार मानले व धीरज परदेशी यानी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी सर्व रोटरी क्लबचे सर्व सभासद तसेच भोसे गावचे उपसरपंच दीपक लोणारी व पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी 10 नवीन सदस्य रोटरी परिवारात सामील झाले
त्यामध्ये , डॉक्टर संकेत झीरंगे ,डॉ योगेश कटारिया उद्योजक दत्ता शेठ भेगडे , विशाल कड , पूजा गुंडगळ , श्रीकांत खोदडे, अशोक पवळे ,योगेश डुकरे ,जयेश गवई आदींचा समावेश आहे

Previous articleकाळात डिजिटल व ऑनलाईन शिक्षणावर भर देण्याची गरज-कल्याणराव विधाते
Next articleउरूळी कांचनमध्ये हॉटेल व्यवसायीक रामदास आखाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला