सागर गावडे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरु गौरव रत्न पुरस्कार प्रदान

दिनेश पवार,दौंड

दौंड येथील जनता प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व ऑल इंडिया अँब्याकस प्रा.लि. कंपनी चे संस्थापक सागर हिराचंद गावडे सर यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरू गौरव शिक्षक रत्न पुरस्कार माननीय अजित दादा पवार उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते व मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे देण्यात आला.

शालेय स्तरावर विविध उपक्रम ऑनलाईन व ऑफलाईन दर्जेदार अध्यापन,गुणवत्ता तसेच या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणित विषयाची आवड व शिक्षकांना अबॅकस शाखा रोजगार संधी व प्रशिक्षण तसेच पालकांना शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात आले या सर्वांची दखल घेऊन हा पुरस्कार वितरित करण्यात आला मागील वर्षी ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार देण्यात आला होता.

अजित दादा पवार यांनी आपल्या भाषणातून शाबासकीची थाप देऊन गौरवोद्गार काढले व जास्तीत जास्त विद्यार्थी व शिक्षक सागर गावडे सरांनी अबॅकसच्या माध्यमातून घडवावेत असे सांगितले या पुरस्कारामुळे संपूर्ण पंचक्रोशीतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Previous articleनिमगाव, दावडी परिसरात धुमाकूळ घालणार बिबट्या जेरबंद
Next articleकाळात डिजिटल व ऑनलाईन शिक्षणावर भर देण्याची गरज-कल्याणराव विधाते