निमगाव, दावडी परिसरात धुमाकूळ घालणार बिबट्या जेरबंद

खेड – तालुक्यातील पुर्व भागातील निमगाव ,दावडी परिसरात अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या दोन वर्षे वयाच्या नर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. बिबट्याला जेरबंद केल्यामुळे दावडीचे सरपंच संभाजी घारे, उपसरपंच राहूल कदम ग्रामपंचायत सदस्य संतोष सातपुते, हिरामण खेसे यांच्यासह शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

बिबट्याने परिसरातील जनावरे , शेळ्या,कुत्रे यांचा फडशा पाडला होता . या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने दावडी व निमगाव परिसरात पिंजरा लावला होता. आज सकाळी शेतकऱ्यांनी बिबट्या अडकल्याचे पाहून वनविभागाला माहिती दिली. पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला माणिकडोह परिसरात सोडण्यात आले अशी माहिती वनरक्षक सुषमा चौधरी यांनी दिली.

Previous articleपी के ज्युनिअर कॉलेजमध्ये यावर्षीपासून इंग्रजी माध्यमातून कला (Art) शाखेबरोबरच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची सोय
Next articleसागर गावडे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरु गौरव रत्न पुरस्कार प्रदान