मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी बाळासाहेब काळोखे यांची नियुक्ती

तीर्थक्षेत्र देहू येथील माजी ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, देहू-आळंदी परिसर विकास समितीचे सदस्य बाळासाहेब सोपान काळोखे तथा अण्णा यांची मावळ विधानसभा मतदार संघाकरिता राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.

मावळ तालुक्याचे आमदार सुनिल अण्णा शेळके, राष्ट्रवादीचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदिपदादा गारटकर, मावळ तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठलराव शिंदे यांच्या उपस्थितीत वडगाव मावळ येथे बाळासाहेब काळोखे यांना सरचिटणीस पदाच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

माझ्या पाठीशी दहा वर्ष ग्रामपंचायत सदस्य पदाचा अनुभव आहे.तसेच पक्षाच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीमध्ये मी योगदान देत आलेलो आहे. आता सरचिटणीस पदासाठी माझी निवड करून पक्षाने जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला पाईक होण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेल. देहू पंचक्रोशीतील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न पक्षाच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करेल व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी मी अहोरात्र कार्यरत राहील असा ठाम विश्वास बाळासाहेब काळोखे यांनी व्यक्त केला.

यावेळी देहूचे माजी उपसरपंच रमेश काळोखे, माजी उपसरपंच अभिजीत काळोखे, माजी उपसरपंच सचिन साळुंके, प्रा. विकास कंद, तुकाराम काळोखे, सचिन काळोखे, प्रशांत काळोखे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleखेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने १२९ विद्यार्थ्यांना सुमारे ८ लाख ३३ हजार रूपयांंच्या शिष्यवृत्तीचे वाटप
Next articleपी के ज्युनिअर कॉलेजमध्ये यावर्षीपासून इंग्रजी माध्यमातून कला (Art) शाखेबरोबरच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची सोय