उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तक घेतलेल्या अतितीव्र कुपोषित बालकांसाठी पोषण आहार किट चे वाटप

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दौंड तालुका व परीसरातील दत्तक घेतलेल्या अतितीव्र कुपोषित बालकांसासठी पोषण आहार किटचे वाटप पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य- मा.वीरधवल बाबा जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले.परिसरातील दत्तक घेण्यात आलेल्या अतितीव्र कुपोषित बालकांसाठी आवश्यक असणारे परिपूर्ण पोषण आहारातील सर्व वस्तूंचा यामध्ये समावेश होता, अतिशय उपयुक्त, समाजपयोगी उपक्रम आदरणीय दादांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आल्यामुळे तसेच वीरधवल बाबा जगदाळे यांच्या प्रयत्नातून या गरज असणाऱ्या बालकापर्यंत मदत पोहचली त्यामुळे परिसरातुन समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी खोरवडीच्या सरपंच सौ.जाधवताई मा.पं.सदस्य पोपटराव खोमणे,मा.कैलासराव खोमणे,मा.राहूल धावडे, बालविकास आधिकारी- श्री.धुमाळ साहेब,अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ.जोग मॅडम व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleसर्वांच्या शुभेच्छांमुळे वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत;अधिक समर्पित होऊन काम करण्याचे बळ मिळाले- अजित पवार
Next articleदौंड मध्ये अजित वृक्ष संकल्पना राबवून उपमुख्यमंत्री-मा.अजित पवार यांचा वाढदिवस साजरा