पारगाव शिंगवेत मटका चालवणार्‍यावर कारवाई

वाढदिवसाच्या जाहिरात

प्रमोद दांगट

पारगाव शिंगवे (ता. आंबेगाव ) येथील इंदिरानगर येथे एका खोलीमध्ये बेकायदेशीररित्या कल्याण मटका चालवणाऱ्या दोघांवर मंचर पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्याजवळून 6 हजार 465 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याबाबतची फिर्याद पोलीस जवान राजेश नलावडे यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांना दिनांक 16 रोजी दुपारी 12 च्या दरम्यान पारगाव शिंगवे गावच्या हद्दीत इंदिरानगर येथे एका खोलीमध्ये विनापरवाना कल्याण मटका सुरू असल्याची माहिती समजली. याबाबत त्यांनी पो.ज. राजेश नलावडे पो. कॉ. सोमनाथ वाफगावकर यांना पंच घेऊन सदर ठिकाणी छापा मारण्यास सांगितले. मंचर पोलिसांची टीम सदर ठिकाणी गेली असता त्याठिकाणी दोन इसम हे लाकडी काऊंटर जवळ कल्याण मटका पुस्तक घेऊन बसल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव बबन बाळा साबळे ( वय 50 रा. पारगाव ता.आंबेगाव जि. पुणे ) व इस्लाईल हुसेन मणियार ( वय 52 रा. पारगाव तर्फे शिंगवे ता. आंबेगाव जि. पुणे ) असे सांगितले पोलिसांनी घटनास्थळावरून 6 हजार 465 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरील दोघांवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा.फौजदार कड करत आहे.

Previous articleमंचर -खुनातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा पथकाकडून अटक
Next articleखेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने १२९ विद्यार्थ्यांना सुमारे ८ लाख ३३ हजार रूपयांंच्या शिष्यवृत्तीचे वाटप