उरुळी कांचन- गणराज हॉस्पिटलच्या माध्यमातून महिलांची मोफत आरोग्य तपासणी

अमोल भोसले,उरुळी कांचन

श्री गणराज हॉस्पिटल उरुळी कांचन यांच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर पार पडले. यावेळी शिबिरामध्ये सुमारे १०९ महिलांची विविध आजारांवर तपासणी व उपचार स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ.सुषमा कुंजीर, डॉ मयुरी वनारसे यांच्या कडून करण्यात आली. तसेच डॉ . सुषमा कुंजीर यांच्याकडून महिलांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान देण्यात आले.

यावेळी रुग्णालयाचे संचालक डॉ.समीर ननावरे, डॉ.मयूर पुस्तके व फिजिशियन डॉ. संदीप शिंदे हे उपस्थितीत होते. श्री गणराज हॉस्पिटल मध्ये स्त्रीरोग व प्रसूती विभाग नव्याने सुरु करण्यात आला. हा विभाग अद्यावत उपकरणांनी सज्ज आहे. येथे नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरिअन, गर्भाशयाची पिशवी काढणे तसेच दुर्बिणीद्वारे करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांची २४ तास सुविधा आहे. त्यासोबत सर्वप्रकारचे मेडिक्लेम्स व कॅशलेसची सुविधा आहे.

यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या किर्ती कांचन, पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष कांचन, उरुळी ग्रामपंचायत सरपंच संतोष कांचन, उपसरपंच संचिता कांचन व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ सुचिता कदम, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कांचन, अमित कांचन, मयूर कांचन, सुनिल तांबे, जानाई डेव्हलपर्सचे सागर कांचन, युवा नेते अंलकार कांचन उपस्थित होते.

Previous articleइंधन दरवाढीच्या विरोधात दौंड मध्ये रॅली
Next articleनामदेवाच्या समाजसेवेमुळे गरीबांना मदत -संदिप पाटील