इंधन दरवाढीच्या विरोधात दौंड मध्ये रॅली

वाढदिवसाच्या जाहिरात

दिनेश पवार,दौंड

दौंड शहर व तालुका कॉंग्रेस कमिटी, दौंड शहर व तालुका युवक कॉंग्रेस, पुणे जिल्हा पर्यावरण कॉंग्रेस च्या वतीने वाढती महागाई, पेट्रोल, डीझेंल,गॅस दरवाढी विरोधात सायकल रॅली आयोजित करून केंद्र सरकार चा जाहिर निषेध करण्यात आला छत्रपति शिवाजी चौकतून सायकल रॅली ची सुरवात करून रिलायंस पेट्रोल पंप येथे शेवट करण्यात आला.

यावेळी तालुकाध्यक्ष विठ्ठल खराडे, प्रकाश विष्णू सोनवणे तालुका महासचिव, शहराध्यक्ष हरेष ओझा, महेश जगदाळे उपाध्यक्ष युवक तालुकाध्यक्ष अतुल जगदाळे, पर्यावरण कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष तन्मय पवार, स्वप्नील सोनवने,बापु बारवकर, विठ्ठल शिपलकर, रज्जाक शेख, रमेश शिंदे,अतुल थोरात, ऋषीकेश वागसकर,आमीत थोरात,व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते
या रॅली चे नियोजन दौंड शहर कॉंग्रेस कमिटी व तालुका युवक कॉंग्रेस कमिटी च्या सहयोगाने करण्यात आले होते.

Previous articleरुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या रुग्णालयांवर गुन्हे दाखल करून मान्यता रद्द करण्याची मागणी
Next articleउरुळी कांचन- गणराज हॉस्पिटलच्या माध्यमातून महिलांची मोफत आरोग्य तपासणी