रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या रुग्णालयांवर गुन्हे दाखल करून मान्यता रद्द करण्याची मागणी

वाढदिवसाच्या जाहिरात

दिनेश पवार,दौंड

कोरोना कोविड 19 चा प्रादुर्भाव वाढल्याने आढावा घेण्यासाठी सासवड उपविभागीय अधिकारी तथा प्रांतधिकारी हे शासकीय कामानिमित्त दौंड तहसील कार्यालयात आल्याची बातमी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना समजताच नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य महासचिव ऍड.डॉ.केवलजी उके यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांच्या नेतृत्वाखाली दादा जाधव,पांडुरंग गडेकर,प्रकाश पारदासनी महेश नवगिरे अमर जोगदंड संतोष जाधव अमित मोरे यांच्या शिष्टमंडळाने प्रांतधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देऊन चर्चा केली.

राज्य सचिव वैभव गिते यांनी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयात पिवळी,केशरी व पांढऱ्या शिधापत्रिका धारक सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांना कोरोना कोविड 19 या आजारावर मोफत उपचार मिळालेच पाहिजेत.रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या हॉस्पिटलवर गुन्हे दाखल करून मान्यता रद्द करावी अशी मागणी केली.

पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक दादा जाधवांनी दौंड व पुरंदर तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या व्यथा प्रशासन दरबारी मांडून गरिबांना मोफत उपचार देण्यात भेदभाव करू नये असे सांगितले
पुणे जिल्हा निरिक्षक पांडुरंग गडेकर यांनी निवेदनावर तात्काळ कार्यवाही न झाल्यास दौंड तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा गंभीर इशारा दिला आहे.

यावेळी प्रकाश पारदासनी,भाऊ भागवत,नवनाथ भागवत,प्रणव संदीप भागवत हे उपस्थित होते.पुरंदर व दौण्डचे प्रांतधिकारी यांनी रुग्णालयांकडू अहवाल कार्यवाही करतो असे आश्वासन संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिले.

Previous articleकृषी पदवीच्या शैक्षणिक शुल्कात मिळणार सवलत,कृषी पदवीधर संघटनेच्या मागणीला यश
Next articleइंधन दरवाढीच्या विरोधात दौंड मध्ये रॅली