कृषी पदवीच्या शैक्षणिक शुल्कात मिळणार सवलत,कृषी पदवीधर संघटनेच्या मागणीला यश

दिनेश पवार:दौंड

राज्यातील कृषि व संलग्न पदवीधर विद्यार्थी यांच्या शैक्षणिक शुल्कात कृषि मंत्री यांनी कृषि पदवीधर संघटना च्या तीव्र नाराजी व सोशल मिडिया वरील मोहीमे नंतर “फी माफी” चा निर्णय घेतला आहे असे वक्तव्य मंगल कडूस पाटील यांनी केले आहे. असाच निर्णय पदविका विद्यार्थ्यां बद्दल देखील व्हायला हवा. असे मत कृषि पदवीधर संघटना अध्यक्ष मंगल कडूस पाटील म्हणाल्या आहेत.

हा विषय राज्यात सर्वप्रथम कृषि मंत्री यांना स्वतः महेश कडूस पाटील यांनी व विद्यार्थी चे अध्यक्ष मनीष भदाणे पाटील यांनी माननीय मंत्री दादाजी भुसे यांना भेटून मांडला होता असे श्रीमती कडूस पाटील यांनी सांगितले आहे. याचे सर्व श्रेय कृषि पदवीधर संघटना कट्टर विद्यार्थी कार्यकर्ते स्वयंसेवक यांना जाते. 29 जून रोजी कृषी पदवीधर संघटनेचे कृषि मंत्री यांना अधिकृत मागणी पत्र आहे त्यामुळे याचे श्रेय आमच्या विद्यार्थी कार्यकर्ते यांचे आहे.
कृषि पदवीधर संघटना राज्यात गेले दहा वर्षे काम करीत आहे.

या संघटनेकडे बघूनच अनेक नवीन लोक कार्यरत झाले असावेत परंतु आमचे संघटन हे आतून मजबूत आहे त्यामुळे आम्ही काम करतो श्रेय घेत नाही असे श्रीमती मंगल कडूस पाटील यांनी सांगितले आहे. उमेश पाटिल, तेजस घारे, गणेश कायगुडे पाटिल, अश्विनकुमार पाटील, ओंकार गोडसे, नुतन जाधव , पुर्वा जाधव, राधेश्याम गायकवाड, सिध्दार्थ चव्हाण अशा संघटना परिवारातील अनेक युवती विद्यार्थी युवक यांनी निवेदन दिले

श्रीमती कडूस पाटील यांनी राज्यातील कृषि व संलग्न पदवीधर विद्यार्थी यांचे व संघटना कार्यकर्ते यांचे अभिनंदन केले आहे, कृषि पदवीधर संघटने चा संपुर्ण विजय झाला असे त्या म्हणाल्या आहेत व त्यांनी विशेष आभार डॉ हरिहर कौसडीकर यांचे मानले आहेत.

Previous articleदौंडमध्ये वाळू माफियांवर महसूल विभागाची कारवाई
Next articleरुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या रुग्णालयांवर गुन्हे दाखल करून मान्यता रद्द करण्याची मागणी