दौंडमध्ये वाळू माफियांवर महसूल विभागाची कारवाई

वाढदिवसाच्या जाहिरात

दिनेश पवार,दौंड

भीमा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवरती महसूल विभागाने नायगाव, वाटलूज,मलठण येथे मोठी कारवाई केली, सदर कारवाई दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार सचिन आखाडे यांच्या पथकाने केली आहे, या कारवाईत 3 सेक्शन बोट व 3 फायबर बोट असा एकूण 60 लक्ष रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

या कारवाईमध्ये महसूल विभागातील अव्वल कारकून विजय खारतोडे, मंडल अधिकारी नेवसे,लोणकर, तसेच तलाठी दुष्यंत पाटील, अजबे, ढगे, सोनवणे,भोसले व पांढरपट्टे हे सहभागी झाले होते, या कारवाई मुळे पूर्व भागातील होणाऱ्या अवैध वाळू उपश्याला नक्कीच आळा बसेल अशी परिसरातून चर्चा होत आहे

Previous articleलोणावळा व ग्रामीण पर्यटन स्थळांवर कडक नाकाबंदी
Next articleकृषी पदवीच्या शैक्षणिक शुल्कात मिळणार सवलत,कृषी पदवीधर संघटनेच्या मागणीला यश