नारायणगाव येथे रेडिमेड कपड्याच्या गोदामाला आग:पंचवीस लाख रुपयांचा ऐवज आगीत खाक

वाढदिवसाच्या जाहिरात

नारायणगाव (किरण वाजगे)

नारायणगाव (ता. जुन्नर) येथील अडसरे बंधू यांच्या मालकीच्या प्रीतम बिल्डिंग मधील पहिल्या माळ्यावरील दोन गाळ्यांना आज (१६ जुलै रोजी) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये येथील चोरडिया बंधू यांचे रेडिमेड कपड्यांचे गोडाऊन होते. यामध्ये सुमारे पंचवीस लाख रुपयांचा रेडीमेड कपड्यांचा माल जळून खाक झाला असल्याचा अंदाज गोडाऊन चे मालक चोरडिया यांनी सांगितले.

दरम्यान घटनास्थळी नारायणगाव पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे तसेच पोलीस कर्मचारी, नारायणगाव ग्रामपंचायतीचे कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांनी अग्निशमन दलाच्या जुन्नर येथील कर्मचाऱ्यांना आग विझविण्यासाठी मदत केली. ही आग सातत्याने होणाऱ्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे लागली असावी असा अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी व या बिल्डिंग चे मालक अडसरे बंधू यांनी व्यक्त केला आहे.एवढी घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी उसळली होती

Previous articleअधिकृत उद्घाटन व्हायच्या आधीच नारायणगाव बाह्यवळण रस्त्याचे माजी खासदार आढळराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
Next articleपर्यटन स्थळांवर गर्दीऐवजी मन:शांतीला पसंती