अखिल भारतीय महिला पोलिस संरक्षण संघटनेच्या वतीने पिंपळवंडी येथे वृक्षारोपण

वाढदिवसाच्या जाहिरात

नारायणगाव (किरण वाजगे)

अखिल भारतीय महिला पोलिस संरक्षण संघटना पुणे जिल्हा व जुन्नर तालुका यांच्यावतीने पिंपळवंडी येथील पोलिस दुरक्षेत्राच्या आवारात नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले.

महिला पोलीस संरक्षण संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षा स्मिता दुसाने, कार्याध्यक्षा अर्चना पडवळ, डाॅ जतीन दुगड, प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष कबाडी, उपाध्यक्ष आर. डी. सरोदे, कार्याध्यक्ष सागर लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


या प्रसंगी पंचायत समितीच्या माजी सभापती संगीता वाघ, शारदा कसबे, वर्षा जाधव, सुनिता कदम, सुरेखा वाघ, किरण पाडेकर, पिंपळवंडी पोलिस दुरक्षेत्राचे पोलीस अधिकारी रफीक तडवी व ग्रामस्थ उपस्थित होते.

एवढे संघटनेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची व कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना पडवळ यांनी केले. तर आभार आर.डी. सरोदे यांनी मानले.

Previous articleयंदा पीक विमा योजनेकडे शेतक-यांनी फिरविली पाठ
Next articleआघाडीची व युतीची चिंता न करता कामाला लागा – शिवसेना जिल्हाप्रमुख शरद सोनवणे