दौंड पोलिसांची अवैध धंद्याविरोधात धडक मोहीम

दिनेश पवार,दौंड

दौंड पोलिसांनी पोलीस स्टेशन हद्दीतील सुरू असणाऱ्या अवैध धंद्याच्या विरोधात जोरदार मोहीम राबविली आहे, गेल्या पंधरा दिवसापासून दौंड पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या नेतृत्वाखाली बेकायदा जुगार खेळणाऱ्यावरती,अवैध दारू धंद्याविरोधी,बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यावरती,अनैतिक वेश्या व्यवसाय करणाऱ्या वरती कडक मोहीम राबवून कडक स्वरूपात कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, यामध्ये वाळू माफियांवर कारवाई करत दोन व्यक्तीवर गुन्हे दाखल करून आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, पिटा अंतर्गत कारवाई करत तीन व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,जुगार व मटका मध्ये 4 गुन्हे दाखल करत 11 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे,अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर 18 गुन्हे दाखल करत 23 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे या कारवाई मुळे दौंड परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली असून याही पुढे ही कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहाय्याक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक वाघमारे,खरात,लोंढे,पालवे,सहा. फौजदार, भाकरे,गायकवाड,शिंदे,जाधव,पोलीस हवालदार थोरात,गुपचे,चव्हाण,जाधव,गावडे,गायकवाड,राऊत,मलगुंडे,होले,शिंदे,बंडगर यांनी या कारवाई मध्ये सहभाग घेतला

Previous articleकोहिनूरच्या आटा चक्कीच्या नावाने बनावट आटा चक्कीची विक्री करणाऱ्या अकोले येथील “शेतकरी मशिनरी” या दुकानावर नारायणगाव पोलिसांचा छापा
Next articleपुरातन कुकडेश्वर मंदिराचा कळस उभारण्यासाठी आराखडा व अंदाजपत्रक तयार करण्याचे पुरातत्व विभागाच्या संचालकांचे निर्देश- खासदार डॉ. अमोल कोल्हे