शिक्षणा फाऊंडेशन आणि विभा इंडीया यांच्या वतीने वैद्यकीय साहित्याची मदत

अमोल भोसले,उरुळी कांचन

कोवीड १९ संभाव्य तिसरी लाट थोपवण्यासाठी राज्य शासनाकडून अनेक उपाय योजना आणि पुर्व तयारी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षणा फाऊंडेशन आणि विभा इंडिया या सामाजिक संस्थांनी वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी एक मोहिम राबविली होती. या मोहिमेतून पीपीई कीट, हॅण्ड ग्लोज, सर्जिकल ग्लोज, N95 मास्क, सर्जिकल मास्क असे साहीत्य पंचायत समिती हवेली, आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आले.

याप्रसंगी हवेली तालुक्याचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, तालुका गटशिक्षणाधिकारी रामदास वालझडे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ सचिन खरात , हवेली तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष रमेश कुंजीर, सामाजिक कार्यकर्ते शैलेश गायकवाड, तंत्रस्नेही शिक्षक संदिप गायकवाड तसेच शिक्षणा फाऊंडेशनचे राज्य समन्वयक निलेश जाधव, हवेली तालुका समन्वयक कल्याणी पायगुडे, दौंड, पुरंदर तालुका समन्वयक सुनिल शेलार उपस्थित होते.

आगामी काळात शिक्षणा फाऊंडेशन कार्यरत असलेल्या दौंड आणि पुरंदर तालुक्यात देखील मदत सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती निलेश जाधव यांनी दिली. शिक्षणा फाऊंडेशन संस्थेच्या शैक्षणिक कामाबद्दल आणि सामाजिक बांधिलकी बद्दल गटविकास अधिकारी शिर्के यांनी कौतुक केले.

Previous articleखडकवासला धरणाजवळ फरार आरोपी कडून गावठी पिस्तूल व काडतुस जप्त,पुणे ग्रामीण LCBची कामगिरी
Next articleकोहिनूरच्या आटा चक्कीच्या नावाने बनावट आटा चक्कीची विक्री करणाऱ्या अकोले येथील “शेतकरी मशिनरी” या दुकानावर नारायणगाव पोलिसांचा छापा